लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांनी मतदार दूत बनावे- विस्तार अधिकारी गणराज येरमळ
परभणी,दि 28 (प्रतिनिधी)ः
भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठि शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक घटकाची जबाबदारी म्हणून काम करणे गरजेचे आहे.यातच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील,शेजारी,
नातेवाईक यांना लोकसभेसाठि मतदान करावे म्हणून हट्ट धरावा. मतदान करण्यापासून कोणीही वंचित राहु नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी मतदार दूत बनावे असे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी तथा जिल्हास्तरीय स्वीप पथकाचे मार्गदर्शक गणराज येरमळ यांनी केले. शहरातील एकता नगर येथील गांधी विद्यालयात बुधवार (दी.27) रोज नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हा स्तरीय स्वीप पथकाच्या वतीने मतदार जनजागृति अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गणराज येरमळ,पर्यवेक्षक आर. आर. जाधव,सहाय्यक पर्यवेक्षक पी.आर. जाधव,डी. एल.नखाते, प्रवीण वायकोश, हनुमंत हंबिर,अरविंद शहाणे,प्रेमेंद्र भावसार, त्र्यंबक वडसकर,रामप्रसाद अवचार,भारत शहाणे,मोहन आल्हाट, महेश देशमुख,प्रसन्न भावसार आदिंची उपस्थिती होती.याप्रसंगी मतदान गीत,लघुनाटिका अदि माध्यमातुन जनजागृति करण्यात आली.यावेळी मतदार दूत म्हणून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.सूत्रसंचालन बबन आव्हाड यांनी तर आभार पी.आर. जाधव यांनी मानले.