विद्यार्थ्यांनी वास्तववादी स्वप्न बघावीत

करिअर कट्टा राज्य प्रमुख यशवंत शितोळे यांचे प्रतिपादन

0 125

 

 

 

परभणी, प्रतिनिधी – मोबाइलच्या प्रचंड वापराने विद्यार्थ्यांमधली विचार क्षमता कमी होताना दिसत आहे. परिणामी विद्यार्थी आपल्या भविष्याप्रति गंभीर दिसत नाहीत. अशा वेळी विद्यार्थ्यांनी वास्तववादी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन करिअर कट्टा राज्य प्रमुख यशवंत शितोळे यांनी केले.

श्री शिवाजी महाविद्यालयात करिअर कट्ट्याच्या वतीने मंगळवार (दि.२२) रोजी विद्यार्थी संवाद मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव होते. सोबत जिल्हा समन्वयक डॉ.श्रीधर कोल्हे, डॉ.दिगंबर रोडे यांची उपस्थिती होती.

युवकांचा सर्वांगीण विकास या विषयावर बोलताना शितोळे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी करिअरच्या बाबतीत दुसरा पर्याय तयार ठेवला पाहिजे. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून शेकडो अधिकारी विद्यार्थ्यांच्या भेटीला ऑनलाईन पध्दतीने येणार आहेत. रोजगार, उद्योजक आदीं मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, करिअर कट्टा विद्यार्थ्यांना मिळालेली मोठी संधी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण ज्ञान मिळत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळातही ज्ञानदानाचे कार्य केले याचे फलित म्हणून अलीकडेच परिसर मुलाखतीतून ६५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड झाली असेही मत त्यांनी नोंदवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ.दिगंबर रोडे, सूत्रसंचालन डॉ. शेख एम.ए. यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मदन परतूरकर यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी डॉ.एच.एस. जगताप, डॉ.सुरज आडे, डॉ.जयंत बोबडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!