विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखूमुक्त जीवनाची शपथ
सेलू, प्रतिनिधी – येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात नशाबंदी मंडळ,महाराष्ट्र राज्य तर्फे राबविण्यात येणाऱ्या तंबाखूमुक्त जीवन संकल्प उपक्रमात इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी सहशिक्षक अभिषेक राजूरकर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना ‘तंबाखूमुक्त जीवनाची शपथ’ दिली.तसेच यानिमित्ताने शालेय परिसर स्वच्छ, तंबाखूमुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक शंकर शितोळे,सहशिक्षक अनिल कौसडीकर,सौ.रागिणी जकाते, विनोद मंडलिक ,विजय चौधरी,काशिनाथ पांचाळ,सौ.स्वप्नाली देवडे,सौ जोशी,श्री थोरात,श्री सोनवणे यांनी देखील सहभाग नोंदवला.