भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

10 427

पुणे – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे यांच्या वतीने “रीसेंट अ‍ॅडव्हान्सेस इन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड सायन्सेस (ICRAES-2K25)” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक २२ व २३ एप्रिल २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व परिषदेचे संयोजक डॉ. राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली. ही परिषद महाविद्यालयाच्या इंटर्नल क्वालिटी एशुरेंस सेल (IQAC) यांच्या पुढाकाराने संपन्न झाली.

 

या परिषदेचा उद्घाटन सोहळा २२ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न झाला. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष पद डॉ. अस्मिता जगताप (कार्यकारी संचालिका, आरोग्य विज्ञान, भारती विद्यापीठ), यांनी भुषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पराग काळकर (उप कुलगुरू, आणि अध्यक्ष, बोर्डस ऑफ डीन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), डॉ. के. डी. जाधव (सहकार्यवाह, प्रशासन), डॉ. अनुराग श्रीवास्तव आणि श्री. विनायक जोगळेकर (अध्यक्ष, FSAI, पुणे चैप्टर) हे उपस्थित होते. डॉ. इम्रे फेल्डे (हंगेरी), डॉ. जे. व्ही. रमना रेड्डी (जपान) व डॉ. हेनरी श्रेकर (ब्राझील) यांनी ऑनलाइन उपस्थिती नोंदवली.

 

डॉ. अस्मिता जगताप यांनी उद्घाटनपर भाषणात वैज्ञानिक दृष्टिकोन, आंतरशाखीय संशोधन व नवोन्मेष यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी बालपणीचे उदाहरण देत “मेहनतीला पर्याय नाही” असा प्रेरणादायी संदेश दिला. भारती विद्यापीठाची १९६४ मधील स्थापना, त्यामागील सामाजिक गरजांची ओळख व त्यातून सुरु झालेला प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. सद्य:कालीन संशोधन व नवोन्मेषाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

डॉ. पराग काळकर यांनी तांत्रिक शिक्षणातील दर्जात्मक सुधारणांचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सस्टेनेबल इंजिनीअरिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सेन्सर आधारित उपकरणे, रोबोटिक्स, ऑटोमेशन, डेटा सायन्स, गुगल मॅपचे महत्त्व, मानवी बुद्धिमत्ता आदी आधुनिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, “संशोधन ते पेटंट”, “संशोधन ते प्रक्रिया”, “संशोधन ते किंमत”, “संशोधन ते उत्पादन”, “संशोधन ते धोरणे” या संकल्पनांवर भर दिला. याचे निष्कर्ष म्हणून “संशोधन ते परिषद” व “डिजिटल बँकिंग जगतातील” उपयुक्तता स्पष्ट केली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रातील दिशादर्शन लाभले.

 

या सोहळ्यात परिषदेसाठी विशेष प्रकाशित करण्यात आलेल्या आय एस बी एन क्रमांक (ISBN) सहित संशोधन प्रगती पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

या परिषदेमध्ये भारतासह ब्राझील, हंगेरी, जपान, मलेशिया येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. डॉ. हेनरी श्रेकर (ब्राझील), डॉ. इम्रे फेल्डे (हंगेरी), डॉ. जे. व्ही. रमना रेड्डी (जपान), व डॉ. अनुराग श्रीवास्तव (मलेशिया) हे आंतरराष्ट्रीय कीनोट वक्ते म्हणून उपस्थित होते.

डॉ. जे. व्ही. रमना रेड्डी यांनी “Type-A अओर्टिक डिसेक्शन” या जीवघेण्या हृदयविकारावरील संगणकीय मॉडेलिंगवर व्याख्यान सादर केले. या संशोधनाद्वारे त्यांनी हृदयशस्त्रतज्ञांना वेळेवर आणि प्रभावी उपचार निर्णय घेण्यासाठी मदत करणारा एक नवा मेट्रिक सादर केला. डॉ. रेड्डी यांनी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि डेटा सायन्स यांचा समन्वय साधणारे विचार व्यक्त केले. यात रुग्ण-विशिष्ट माहिती आणि जैव-यांत्रिकी सिम्युलेशन्स एकत्र करून अचूक निदान व उपचार मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येते. या अभ्यासामुळे केवळ उपचाराची गुणवत्ता सुधारेल असे नाही, तर रक्तवाहिन्यांच्या आरोग्याविषयी अधिक सखोल समजही प्राप्त होईल. वैद्यकीय व तांत्रिक क्षेत्रात अशा प्रकारची बहुविषयक ससंशोधनपद्धती द्वारे नव्या दिशेने वाटचाल होण्यास मदत होईल आणि रुग्णांचे परिणाम अधिक सकारात्मक होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

डॉ. श्रीवास्तव यांनी “Intellectual Property Rights – Policy Framework and Innovation” या विषयावर सखोल विवेचन करत बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व, संशोधन व नवोन्मेषाच्या जागतिक परिप्रेक्ष्यातील भूमिका विशद केली.

या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांद्वारे ६१४ संशोधन प्रबंध सादर करण्यात आले, त्यापैकी ३ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणि ४१ शोधनिबंध औद्योगिक क्षेत्रातून प्राप्त झाले. भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठांतील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.

 

२३ एप्रिल रोजी सायंकाळी समारोप सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे डॉ. ए. बी. मोरे (कार्यकारी सदस्य, इंडियन सोसाइटी फॉर टेक्निकल एजुकेशन (ISTE), महाराष्ट्र आणी गोवा) यांनी ISTE संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत भारतातील तांत्रिक शिक्षणात त्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ISTE संस्थेच्या शैक्षणिक व संशोधनातील योगदानाविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी उत्कृष्ट प्रबंधांना पारितोषिके जाहीर करत सर्व सहभागी संशोधकांचे कौतुक केले.

प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार पाटील यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनामध्ये योगदान दिलेल्या सर्व समित्यांचे, विभागप्रमुखांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक कौतुक केले. यांनी संशोधन व नवोन्मेषाच्या दिशेने विद्यार्थ्यांनी पाऊल उचलावे, असे आवाहन केले.

त्यांनी विशेषतः समन्वय समिती, प्रकाशन, पुनरावलोकन, तांत्रिक, आर्थिक व स्वागत समितीच्या सदस्यांचे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचे, विशेषतः डॉ. पाटील उदय, डॉ. पाटकर उदय, डॉ. देवदत्त मोकाशी, डॉ. पाटील संग्राम, डॉ. अतिश माने, डॉ. शिखा श्रीवास, डॉ. अतिश माने, डॉ. स्वप्नील माने, डॉ. अजित पाटील, डॉ. स्वाती गव्हाळे, डॉ. वाणी ललिता, डॉ. सागर धामोने, प्रा. किरण जाधव, प्रा. प्रशांत कदम, प्रा. पाटील सुनीलकुमार, प्रा. राऊत निलेश, प्रा. मेघा पाटील, प्रा. रहाटे प्रमोद, प्रा. अमृता पसारकर, प्रा. देशमुख प्रवीण, प्रा. सातव शुभांगी, प्रा. हसबे अजिंक्य, प्रा. कुंकुम बाळा, प्रा. दातारकर अविनाश, प्रा. केतन कुरकूटे, प्रा. ऐश्वर्या पाठक, प्रा. अतुल वाणी, प्रा. तेजल पाटील, प्रा. आश्विनी भपकर, प्रा. प्रियंका तकळकर, प्रा. उर्वशी भट, प्रा. श्रुती गुंजोटीकर, प्रा. निलेश सिंग, प्रा. नीरज गांगुर्डे, श्री. संदीप जाधव, श्री. मुलिक संजय, श्री. लाड संदिप, श्री. मदने सचिन, श्री. सावंत वैश्विक, श्री. थोरात बाबासाहेब, श्री. जाधव जयवंतराव, श्री. कदम अविनाश, श्री. कांबळे शिवाजी, श्री. पाटील प्रदीप, श्री जाधव प्रभाकर, श्री. यादव उदयसिंह, श्री. वावळे गोरखानाथ, श्री. गोरे संतोष, श्री. फडतरे, श्री. कुरळे, श्री. मोहिते, श्री. कदम गणेश, श्री. गोरे संजय, श्री. शिरतोडे, श्री. दळवी रणजित, श्री. गोतपगार योगेश, श्री. नलवडे, श्री. चंद्रकांत यादव, श्रीकांत पाटील, श्री. पाटील बाबा, श्री. तवर, श्री मोरे, श्री. दंडवते शरद, श्री. कोळे शुभम यांचे नाव घेऊन आभार मानले.

 

परिषदेच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रा. योगेश कदम, डॉ. ज्योती ढाणके व डॉ. निधी जैन यांनी संयोजक म्हणून, तर डॉ. शंकर कदम यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. लीना चौधरी यांनी केले आणि डॉ. निधी जैन यांनी आभार प्रदर्शन केले. समारोप ‘वंदे मातरम्’ सादरीकरणाने डॉ. प्रदीप अत्रे, डॉ. संकेत पवार यांनी केले.

ही परिषद आयएसटीई प्रायोजित असून एफएसएआय, रिसर्च अँड फाउंडेशन ऑफ इंडिया व आयईटीई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

 

या परिषदेने संशोधन, नवोन्मेष आणि शैक्षणिक उत्क्रांतीसाठी एक सशक्त व्यासपीठ पुरवले असल्याचे मत सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले. ICRAES-2K25 या परिषदेमुळे नव्या संशोधनविषयांना दिशा मिळाली असून, विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व संशोधकांसाठी ही एक प्रेरणादायी शैक्षणिक पर्वणी ठरली.

error: Content is protected !!