सेलू / प्रतिनिधी – येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्य आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून स्पर्धेतील सहभागासाठी तालुक्यातील विवीध शाळांच्या ८० संघांनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती शिवजन्मोसव समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे व सचिव रामेश्वर शेरे , अप्पूसेठ सोळंके यांनी दिली.
दिनांक १८ फेबुवारी रोजी नूतन विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा खेळवल्या जाणार असून स्पर्धेच्या यशस्वीते साठी लाल मातीची मैदाने तयार करण्यात येत आहेत. लाल मातीच्या मैदान तयारी सुरू असताना प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी , प्रा डॉ राजाराम झोडगे, रामराव गायकवाड , रामराव बोबडे , गोविंद काष्टे , मोगल, ढेंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मुलींच्या कबड्डी स्पर्धा नूतन इनडोअर क्रीडा हॉल मध्ये घेण्यात येणार असून त्यासाठी प्रोकबड्डी प्रमाणे मॅटची मैदाने तयार करण्यात येत आहेत. ही मैदाने तयार करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, राज्य सरचिटणीस गणेश माळवे, संजय भूमकर, राहूल घांडगे आदी परिश्रम घेत आहेत अशी माहिती मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, प्रा नागेश कान्हेकर, डी डी सोनेकर ,राजेभाऊ चव्हाण यांनी दिली.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या डासाळा, खळगाव, वालूर , चिकलठाणा, देऊळगाव गात, सीपीएस कन्या सेलू अशा विविध केंद्रामधून व खाजगी व्यवस्थापनाच्या नूतन विद्यालय , नूतन कन्या, न्यू हायस्कूल, नितीन माध्यमिक, क्रांतिसिंह नाना पाटील, शारदा विद्यालय, विवेकानंद विद्यालय, के .बा.विद्यालय, यासेर उर्दु,यशवंत विद्यालय, पांडूरंग विद्यालय, शांताबाई नखाते विद्यालय, विद्यानिकेतन , ज्ञानतिर्थ विद्यालय अशा अनेक शाळांनी आपली नाव नोंदणी करून स्पर्धेती सहभाग निश्चित केला आहे.