सय्यद शाहबुद्दिन अवलिया यांच्या उरुसास 15 जून पासून प्रारंभ
सेलू,दि 11 (प्रतिनिधी)ः
सेलू शहरातील प्रसिद्ध कामिल अवलीया हझरत सय्यद शाहबुद्दीन सय्यद बुरहानुद्दिन यांचा ऊरुसाची सुरुवात 15 जून बुधवार पासून होणार आहे 15 जून बुधवार रोजी असरच्या नमाझ नंतर 6 वाजता दर्गेस गुसल स्नान करून सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने चादर पुष्प चढवून् मुल्ला मस्जिदचे पेशईमाम हाफीज शफीक खान रिझवी हे दुरुद फातेहा पठण करणार16 जून गुरुवार रोजी झोहर नमाझ नंतर 2 वाजता संदलची सुरुवात उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार मॅडम, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, सेलू पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल17 जून शुक्रवार रोजी उर्स व संध्याकाळी कावालीचा शानदार प्रोग्राम होणार आहे
18 जून शनिवार रोजी फजर
नमाज नंतर सकाळी सहा वाजता त तब्रुख गोड जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.
ऊर्स कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन दर्गा शरीफचे मुत्वल्ली सय्यद कबीर सय्यद अमीर नानू यांच्या सह दर्गा शरीफ उर्स कमिटीच्या उरुज अली खान, इकबाल मोदी, सिद्दिक लष्करया,शेख वाजीद दादा, पत्रकार शेख आरेफ भाई, अबरार बेग, शेख गफारभाई जरगर, सह आदींच्या वतीने करण्यात आले आहे