टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त विजय
मुंबई, गुरुदत्त वाकदेकर – टाटा आयपीएल २०२२ चा आजचा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने ६ गडी आणि २ चेंडू राखून हा सामना जिंकला. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
पंजाब किंग्सकडून जॉनी बेअरस्ट्रोने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ८ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ४० चेंडूंत ५६ धावा काढल्या. त्याला यझुवेंद्र चहलने पायचीत टिपले. जितेश शर्माने ४ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने १८ चेंडूंत नाबाद ३८ धावा काढल्या. भानूका राजपक्षला २७ धावांवर यझुवेंद्र चहलने त्रिफाळाचित केले. लिआम लिव्हिंगस्टोनचा त्रिफाळा २२ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने उध्वस्त केला. यझुवेंद्र चहलने कर्णधार मयंक अगरवालला १५ धावांवर तंबूत परत पाठवले. शिखर धवनला केवळ १२ धावांवर रवीचंद्रन अश्विनने बाद केले. पंजाबने १८९/५ अशी धावसंख्या उभारली. यझुवेंद्र चहलने २८/३, प्रसिद्ध कृष्णा आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक धावा यशस्वी जयस्वालने काढल्या. त्याने ९ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ४१ चेंडूंत ६८ धावा काढल्या. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले. देवदत्त पडीक्कलला ३१ धावांवर अर्शदीप सिंगने बाद केले. जोस बटलरने ५ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने १६ चेंडूंत ३० धावा काढल्या. त्याला कगिसो रबाडाने बाद केले. कर्णधार आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनला ऋषी धवनने २३ धाबाद केले. शिमरॉन हेटमायरने संघाला विजयापर्यंत पोहचवले. त्याने ३ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने १६ चेंडूंत नाबाद ३१ धावा काढल्या. राजस्थान रॉयल्सने १९.४ षटकांत १९०/४ अशी विजयी धावसंख्या नोंदवली. अर्शदीप सिंगने २९/२, कगिसो रबाडा आणि ऋषी धवन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.
यशस्वी जयस्वालला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने ४१ चेंडूंत ६८ धावा काढल्या.