शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून पालवे कुटुंबियांचे सांत्वन

सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन

0 20

 

 

सेलू / प्रतिनिधी – जिंतूर तालुक्यातील मौजे आडगाव दराडे येथील रहिवासी व मंगरूळ ता. मानवत येथील नरसिंह प्राथमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून असलेले श्री. सोपान पालवे यांनी नुकतेच आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते.

शिक्षक आमदार यांनी त्यांच्या गावी जाऊन पालवे कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेतली व पालवे कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना या दुखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या पत्नी यांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याबाबत योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल व त्याचबरोबर त्यांच्या मुलीला, होणाऱ्या लेकराला पण शिक्षण देण्यासाठी मा. खा. सुप्रियाताई सुळे यांनी आश्वासित केलेले आहे, त्याप्रमाणे ती देखील व्यवस्था केली जाईल. व भविष्यात कोणतीही अडचण आल्यास सोबत नेहमीच आहे .अशी ग्वाही पालवे कुटुंबीयांना दिली. यावेळी त्यांचे दोन्ही बंधू ,मातोश्री, पत्नी व आप्तेष्ट नातेवाईक, गावातील प्रमुख पदाधिकारी, तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघाचे श्री. मा.मा सुर्वे सर, पी आर जाधव सर, शिंदे सर, सेलूचे श्री धनंजय भागवत सर, विश्वंभर सर, शिक्षक समन्वय संघाचे दीपक कुलकर्णी सर, कायम विनाअनुदानित कृती समितीचे श्री बंटी मइंग सर, राजकुमार मगर सर यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!