शिक्षकांतर्फे शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षांना चारचाकी वाहन भेट…

1 270

परभणी,दि 01 (प्रतिनिधी)ः
मराठवाड्यात पहिल्यांदाच परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांतर्फे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष किशन इदगे यांना चारचाकी वाहन भेट देण्यात आले.
जिल्हा परिषद कन्या प्रशाला, परभणीमध्ये हा भेट देण्याचा सोहळा ता. ( १) गुरुवार रोजी पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे परभणी जिल्हा संस्थापक अध्यक्ष रामराव लोहट यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाभरातील संघाचे सर्व शिक्षक पदाधिकारी आणि सदस्य व महिला संघशक्तीच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये कार्याध्यक्ष किशन इदगे यांना शिक्षक संघ कार्यासाठी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर दौरा करता यावा म्हणून चारचाकी वाहन भेट देण्याचा संकल्पपूर्ती सोहळा आनंदात पार पडला.
रामराव रोकडे, माणिक घाटूळ,विठ्ठल भोसले, अरुण चव्हाळ, बालासाहेब पवार, सुधीर सोनुनकर, हरिदास कावळे, शेख रुस्तुम, गोकर्ण काळे, संदीप राहुलवार, पुरुषोत्तम पत्तेवार, अरविंद इंगळे, बाबासाहेब पाटील, दीपक क्षीरसागर, परभणी जिल्हा संघाचे नेते मधुकर कदम, बालाजी निलपत्रेवार, जिल्हाभरातील नऊ तालुक्यातील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य शिक्षक आणि शिक्षिका यांनी यासाठी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष लोहट यांनी केले. तर प्रास्ताविक परभणी जिल्हा शाखेचे सचिव शामसुंदर मोकमोड यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार परभणी जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष हरिश्चंद्र भोसले यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!