“सगळं विसरायचं, पण बाप नाही” काल अजितदादांसोबत दिसलेले कोल्हे आज शरद पवारांच्या सोबतीला, म्हणाले…

0 252

मुंबई – अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, आता अजित पवार गटाला बंडानंतरचा पहिला धक्का बसला असून खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

 

शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. तसंच सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे यांच्या रुपाने दोन खासदारही उपस्थित होते. मात्र याच अमोल कोल्हे यांनी काही तासांतच आपली भूमिका बदलली असून मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे.

 


दरम्यान, साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. खासदार कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी भूमिका बदल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

error: Content is protected !!