भारत राष्ट्र समितीचे संस्थापक केसीआर यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा
सोनपेठ दि.(१७)
भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांच्या ७० वा जन्मदिवसाच्या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.
भारत राष्ट्र समितीचे संस्थापक श्री के चंद्रशेखर राव केसीआर यांच्या ७० व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वृक्षारोपण, आरोग्य तपासणी,रक्त तपासणी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि १७ फेब्रुवारी रोजी भारत राष्ट्र समितीचे संस्थापक श्री केसीआर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शहरातील अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यशोधरा निवासी आश्रमशाळेत करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब राठोड हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक राजकुमार धबडे, पत्रकार गणेश पाटील,प्रा.भारत राठोड, खंदारे प्रदिप नागुरे हे उपस्थित होते. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने शहरातील डॉ गणेश मुंडे यांच्या वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये ह्रदय रोग तपासणी शिबीराचे आयोजन ही करण्यात आले होते या शिबिरात जेजे हॉस्पिटलच्या ह्रदय रोग विभागाचे माजी प्रमुख परभणी येथील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ रमेश राठोड यांनी रुग्णांना तपासणी करून उपचार केले. यावेळी रुग्णांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबीराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड डॉ बिभिषण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शिवमल्हार वाघे आशिष मुंडे हे उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन भारत राष्ट्र समितीचे समन्वयक सुधीर बिंदू यांनी केले.