गावखेड्यांचा विकास हेच प्रगतीचे पहिले पाऊल-आ.डॉ.गुट्टे :
(प्रतिनिधी) :-
केवळ शहराचाच नव्हे तर ग्रामीण भागाचाही सर्वांगीण विकास तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे गावोगावी अगदी वाड्या वस्त्यांवर विकासाची गंगा पोहचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. कारण, गावखेड्यांचा विकास हेच प्रगतीचे पहिले पाऊल असल्याचे मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील विविध १२ विकास कामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत निधीसह अंतिम मंजुरी मिळालेल्या त्या १२ कामांसाठी तब्बल ६२ कोटी ७७ लाख रूपये निधी मिळाला आहे.
त्यामध्ये राममा-७५२ (आय) शिरड शहापुर हयातनगर ते पूर्णा राज्यमार्ग-२४९ ला जोडणारा रस्त्याची सुधारणा आणि डांबरीकरण १० कोटी, त्याच रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंट कॉंक्रिटीकरण १० कोटी,हिंगोली-औंढा-हटटा-पूर्णा ते धनगर टाकळी-पालम रस्त्यावर मोठ्या पलाचे बांधकाम १० कोटी, त्याच रस्त्याचे रूंदीकरणसह सिमेंट कॉंक्रिटीकरण व नाली बांधकाम ६ कोटी, पांगरा-लासिणा-पिंपळा लोखंडे-लोन खुर्द-वाई- चूडावा-रामा ६१ चांगेफळ ते कावलगाव वाडी-धानोरा मोत्या रस्ता रूंदीकरणसह सुधारणा ५ कोटी, कातनेश्वर प्रजिमा ९ ते संदलापूर पुढे पिंपळगाव- बाळापुर ते लक्ष्मण नगर ते रामा-२४९ ते नावकी ते प्रजिमा १० ला मिळणारा रस्ता सुधारणा ४ कोटी, पिंगळी-लिमला ते वझुर-रावराजुर रस्ता सुधारणा ३ कोटी, लिमला वझुर प्रजिमा ३५ ते दगडवाडी-बामणी रस्ता
पुलमोऱ्यासह सुधारणा २ कोटी, हिवरा (बु) ते वाई पांगरा पुढे लासिना पूर्णा रस्ता बांधकाम १ कोटी ५० लाख, चुडावा ते चुडावा रेल्वे स्टेशन रस्ता सुधारणा १ कोटी, पूर्णा शहरात राज्यस्तरीय पशू वैद्यकीय चिकित्सालयाचे बांधकाम तसेच बळकटीकरण व आधुनिकीकरण ३ कोटी ८९ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी यांचे टाईप-१ चे निवास बांधकाम १ कोटी ५८ लाख, तालुका क्रीडांगण येथे ग्राउंड, धावपट्टी, कबड्डी, व्हालीबॉल, खो-खो मैदान, संरक्षण भिंत व नाली बांधकाम आणि लेव्हलिगं करणे ४ कोटी ८० लाख रूपये या कामांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण ६२ कोटी ७७ लाख रूपये खर्च होणार आहेत. त्यातून नियोजित १२ कामे मार्गी लागतील.