मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून घेतला शहर स्वच्छतेचा ध्यास

0 258

 

पूर्णा / सुशिलकुमार दळवी – पूर्णा येथील नगर पालिकेने श्रमदानातून स्वच्छतेचा ध्यास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम नगर पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली असुन श्रमदान संबंधित मोहीम आज पासून श्रमदान सुरूच केले आहे. त्यामुळे श्रमदानातून स्वच्छ पूर्णा शहराचा ध्यास घेतल्याचे दिसून येत आहे. येथील पालिकेत नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी सुरवातीपासूनच स्वच्छतेस प्राधान्य दिले आहे. छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुलन परिसरा पासून श्रमदानातून स्वच्छेतस प्रारंभ केला.

मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी45 कर्मचाऱ्यांसह व सर्व विभाग प्रमुखास स्वत: श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. तेथेल स्वच्छता झाल्यावर शहरातील आदी ठिकाणांची श्रमदानातून स्वच्छता केलीजाईल. परिसर स्वच्छतेचे काम हाती घेतले. मोठ्या प्रमाणात कचऱ्यासह पाण्याच्या व काचेच्या रिकाम्या बाटल्या काढण्यात आल्या. शिवाय परिसरात स्वच्छताही करण्यात आली.

 

 

त्यामुळे मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी यापुढेही स्वच्छता मोहीम सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. शहर स्वच्छतेचा त्यांनी घेतलेल्या ध्यासास कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यांना यापुढे आवश्‍यकता आहे, ती लोकसहभागाची. त्यातून शहर स्वच्छ ठेवण्यास निश्‍चितपणे मदत होईल, हे नक्की.‘प्रत्येक आठवड्यातील काही तास श्रमदानातून स्वच्छता मोहीम यापुढे सुरू ठेवणार आहोत त्यामधून शहरातील सार्वजनिक ठिकाणांस इतर ठिकाणाची ही स्वच्छता केली जाईल. या स्वच्छता मोहिमेसाठी शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आव्हान मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी केले आहे.

 

शहरातील व्यापारी व भाजीविक्रेते किरकोळ विक्रेते यांना असे आव्हान करण्यात आले की तुम्ही एकल वापर प्लास्टिक वापर बंद करून टाकण्यात यावा’ जेणेकरून आपल्या शहरात प्रदूषण होणार नाही. यासाठी विशेष प्लास्टिक वापर बंदी साठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
– राजकिरण गुट्टे
स्वच्छता अभियंता न. प पूर्णा

error: Content is protected !!