मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी सकल मराठा समाजाचा सेलू बंद
आरोपींना त्वरित फाशी देण्याची मागणी
सेलू / नारायण पाटील – मासाजोग चे सरपंच संतोष भाऊ देशमुख यांचा अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला .व त्यादिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना खून कसा झाला याची पूर्णपणे कल्पना होती .तरी देखील धनंजय मुंढे यांच्या राजीनाम्याला एवढा वेळ लागला व यातील एक आरोपी अजूनही फरार आहे .या सर्व षडयंत्रात धनंजय मुंढे यांचा हात असून त्यांना आरोपी करण्यात यावे.तसेच मयत संतोष देशमुख चा भाऊ धनंजय देशमुख यांनी जे जे आरोपी व संशयित असल्याचे सांगितले त्या सर्वांना या प्रकरणात आरोपी करून हा खटला फास्टट्रक कोर्टात चालवुन आरोपीनी फाशी देण्यात यावी .
ज्या प्रकारे हे कृत्य करण्यात आले ते फोटो पाहून या सरकारच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित होतात .
तरी सदरील सर्व मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यांत आली आहे .