गायकवाड कुटूंबाला शासकीय मदत देण्याची सकल मराठा समाजाची मागणी

0 15

सेलू / नारायण पाटील – मराठा आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या संदीप रोहीदास गायकवाड यांच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्याची सकल मराठा समाज सेलू च्या वतीने सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

 

संदीप रोहीदास गायकवाड राहणार देऊळगाव गात तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी दिनांक 29-6-2024 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून गळफास घेऊन आपले जीवन मराठा समाजासाठी संपवले होते त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ असा परिवार आहे त्यांचा घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तरी त्यांच्या परिवाराला शासकीय 25 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व परिवारातील एकाला शासकीय सेवेत घेण्यात यावे .अशी मागणी निवेदनाद्वारे सकल मराठा समाज सेलू च्या वतीने करण्यात आली आहे .

 

यावेळी जयसिंग शेळके, श्याम कदम, सचिन कदम, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर कदम, चैतन्य कदम, रवि मोगल, किरण कदम, मच्छिंद्र कदम, गौरव कदम, अर्जुन कदम, सुधीर कदम, आकाश गोरे, सचिन सोळंके, सचिन गोरे व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!