सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव ठरला अविस्मरणीय
सेलू / नारायण पाटील – येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, उत्कर्ष विद्यालय सेलू, प्रॉस्परस पब्लिक स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरावा या निमित्याने शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत, स्पॉट परीक्षा, तोडफोड जोड, कबाड से जुगाड, विज्ञानातील गमती जमती, भाषण स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन ता.१५ वार शनिवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरावा यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व घटक संस्थेतील विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी फुले देऊन स्वागत केले. त्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही तील कार्टून मिकी माउस व जोकर हे करण्यात आले होते. हे कार्टून विद्यार्थ्यांसाठी मुख्य आकर्षण ठरले. या सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना घोडे स्वारी करण्यात आली.
त्याचबरोबर श्रीराम प्रतिष्ठान आऊटस्टडिंग टलेंट (SPOT) स्पॉट परीक्षेचे एकूण २१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेतील विजेत्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांना प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व उत्कर्ष विद्यालय सेलू या शाळेत सवलती प्रवेश देण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाळा.
शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त तोडफोड जोड,कबाड से जुगाड, विज्ञानातील गमती जमती,भाषण स्पर्धा आदी उपक्रमाचे प्रदर्शन खास विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. तोडफोड जोड या उपक्रमात विद्यार्थ्यांना चार चाकी, दुचाकी स्कूटर, टीव्ही, प्रिंटर, सीपीयू इत्यादी उपकरणाविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम विषयी माहिती झाली. या सोबतच कबाड से जुगाड यामध्ये विद्यार्थ्यांनी वेस्ट पासून बेस्ट घरगुती साहित्य तयार केले. तसेच या विद्यार्थ्यांना रिसायकल रियूज रेड्यूस (3R) पर्यावरणासाठी किती महत्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांनी दिली. विज्ञानातील गमती जमती या उपक्रमांतर्गत प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी छोटे छोटे प्रयोग सादर केले व आलेल्या पालकांचे लक्ष वेधून घेतले. भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भाष्य केले माझा शाळेतील पहिला दिवस माझ्या स्वप्नातील शाळा मामाचा गाव इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व घटक संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.