शेतात नांगरताना सापडली मूर्ती

0 247

सेलू ( नारायण पाटील )
तालुक्यातील पारडीमध्ये शेत नांगरताना एक मूर्ती सापडली असून यामूर्तीचे पूजन झाल्यानंतर अनेकांनी मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले आहे .येथील आडे कुटूंबीय व ग्रामस्थांच्या वतीने या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला आहे .
पारडी येथील रवी धरमू आडे हे शेत नांगरत असतांना अचानकच एक दगडी शिळा नांगराने बाहेर आली .लगेच त्यांनी हा प्रकार वडील धरमू आडे व भाऊ विकास आडे यांना सांगितला .
सर्वांनी मिळून त्या शिळेवरील माती पूर्णपणे पाण्याने धुऊन काढली असता त्या शिळेवर सूर्य व चंद्रकोर दिसून आली .त्यावरून सदरील मूर्ती ही शनी देवाची असल्याचे स्पष्ट झाले .
त्यानंतर पुरोहित विलास जोशी ,मनीष जोशी ,गौरव जोशी ,गिरीश जोशी व गजानन मुळे यांच्या हस्ते मूर्तीची विधीवत पूजन करण्यात आले .व धार्मिक प्रकारचा प्रघात असल्याने ही मूर्ती मामा -भांजे यांनी बैलगाडीतून आडे तांडा येथे प्राणप्रतिष्ठा च्या ठीकाणी आणून मूर्तीची विधिवत व मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . त्यानंतर भाविकांनी मूर्तीच्या दर्शनाची एकच गर्दी केली होती .

error: Content is protected !!