पुर्णेतील त्या महीलेच्या खुनाचा पोलीसांनी लावला छडा..दारुच्या वादातून घडली घटना

0 528

पुर्णा/प्रतिनिधी
पुर्णा शहरातील रेल्वेच्या पावर हाऊस पाठीमागे असलेल्या मैदानावर रक्त बंबाळ अवस्थेत आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवण्यात स्थानिक गुन्हा शाखा व पूर्णा पोलीसांच्या टीमला यश मिळाले असुन पोलीसांनी पटवुन खुनाचा गुन्हयात सहभागी असलेल्या ३ जणांना ४८ तासात अटक करुन जेरबंद केले आहे.तसेच सदरील महीलेचा खुन हा दारुच्या वादातून घडल्याचे देखील उघडकीस आणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पूर्णा शहरातील दि. १४/०९/२०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे दिसून आल्याने मा. पो. अ.रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ मा. अपर पो.अ यशवंत काळे, जीवन बेनीवाल भापोसे,स्था .गु.शाखेचे पो.नि.अशोक घोरबांड,पो.नि.विलास गोबाडे यांनी स्टाफसह घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
प्रारंभी पोलीसांनी महीलेची ओळख पटवून त्या रमाबाई भ्र. अनिल चिकाटे वय ५० वर्षे रा. सिद्धार्थ नगर असल्याचे निष्पन्न केले.शनिवारी या याप्रकरणी पूर्णा पोलीसांत गुन्हा नोंदविला.यानंतर स्थान.गु.शाखा तसेच पूर्णा पोलीसांच्या टीमने संयुक्त रित्या कामगीरी करत खुनाचा छडा लावून यातील ३ जणं नामें १)माणिक रामचंद्र मूळे वय ४० वर्षे रा. मूळेगल्ली शिवाजीनगर पूर्णा २) आवेज कुरेशी युसुफ कुरेशी वय ३० वर्षे ३) शादुल कुरेशी युसुफ कुरेशी वय २६ वर्षे दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला, पुर्णा असल्याचे खात्री करुन सदरील महीलेचा खुन हा माणिक मूळे व त्याच्या दोन साथिदार यांनी केल्याचे निष्पन्न केले.घटनेतील आरोपींना पोलीसांच्या पथकाने ४८ तासात अटक करून जेरबंद केले आहे.जीवन बेनीवाल भापोसे उपविपोअ जिंतूर चार्ज पूर्णा, श्री अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी, श्री विलास गोबाडे पोलीस निरीक्षक पूर्णा, श्री पी. डी. भारती सपोनि स्थागूशा परभणी, श्री रामकिशन नांदगावकर सपोनि, पोउपनि चंदनसिंह परीहार, पोउपनि प्रकाश इंगोले, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, साहेब मानेबोईनवाड, अजय माळकर, संदीप चौरे, मंगेश जूकटे, रमाकांत तोटेवाड, गणेश कौटकर, प्रशांत लटपटे, स्वप्नील पोतदार यांनी पार पाडली आहे. यातील अनोळखी मयत महीलेच्या खूनाची उकल सत्वरतेने केल्याने मा. पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
खुन का.? व‌ कशामुळे झाला..?
मयत महीला हिचे दारू अडडयासमोर दारू पिण्याचे कारणावरून वाद झाला होता. सदर महीलेने त्याला दारू घेण्यासाठी दहा रूपये मागितले असता, त्याने तिला दहा रूपये न दिल्याने तिने त्याला चप्पलने मारले. त्याचा राग मनात धरून आरोपी याने तीला दारू पाजण्याचे बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेले व त्या दोघांनी दारू पिली. त्यावेळी त्या ठिकाणी माणिक मूळे याच्या ओळखीचे दोघेजन तिथे आले, त्या चौघांनी मिळून एकत्रीत दारू पिली व सर्वांसमक्ष चपलेने मारल्याच्या कारणावरून तिच्या तोंड व डोके देगडाने ठेवून मारून तिचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तिचा मृतदेह तिघांनी फरपटत आणून काटेरी झुडूपात फेकून दिला

error: Content is protected !!