पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा करून शिक्षकाने ठेवला आदर्श

0 11

 

पूर्णा,दि 08 ः
येथील अभिनव विद्या विहार प्रशाला येथील शिक्षक श्री रोशन धुळे सर व त्यांची अर्धांगिनी सौ पूजा धुळे यांनी आपली मुलगी अधीरा हिचा तिसरा वाढदिवस शाळेमध्ये 50 वेगवेगळे प्रकारची झाडे लावून साजरा केला.

डब्याच्या कुंड्या तयार करून त्याला रंगरंगोटी करून त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून झाडांची लागवड केली.परभणी जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंश डिग्री पेक्षा पुढे जात असताना पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा करून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष  आनंद अजमेरा, संचालिका सौ अर्चना अजमेरा, माजी मुख्याध्यापक श्री हिराजी भोसले  ,संचालक दिलीप माने ,  विजय कदम , जिगर लोढया ,अमोल सोनटक्के व शाळेचे मुख्याध्यापक  सत्यनारायण रणवीर, पर्यवेक्षक  रमेश सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक गजानन इंगोले, सौ गीतांजली क्षीरसागर, नवनाथ भताने, अनुप देशमुख, नंदकिशोर अडबलवार , श्री विश्वनाथ नागठाणे सर, सौ रसिका पळसकर, श्रीमती मीना दगडू , श्रीमती सरस्वती अनमुलवाड, सौ पुर्वी लोडया,  गोलू धुत ,श्री शंकर यमगर इत्यादी सहकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!