लसीचा तिसरा डोस ओमायक्रॉनविरोधात 88 टक्के प्रभावी

0 96

कोरोना व्हायरसच्या सध्याच्या लसीचा तिसरा डोस ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात आपली इम्यूनिटी 88% पर्यंत वाढवू शकतो. हा दावा ब्रिटेनमध्ये नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. यूके हेल्थ सिक्योरिटी एजेंसी (UKHSA)च्या रिपोर्टनुसार, दुसरा डोस घेतल्याच्या 6 महिन्यानंतरच त्याचा प्रभाव 52% कमी होतो. यामुळे कोरोना संक्रमण आणि गंभीर लक्षणांपासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.

ओमायक्रॉन झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून बचाव करतो बूस्टर डोस
UKHSA च्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत बूस्टर डोस ओमायक्रॉनवर कमी परीणाम करतो. मात्र ओमायक्रॉन झाल्यास रुग्णांना गंभीर लक्षणे दिसत नाहीत. यासोबतच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. नुकतेच ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सांगितले होते की, देशाच्या ICUs मध्ये दाखल 90% कोरोना पीडितांना बूस्टर डोस देण्यात आलेला नाही.

रिपोर्टनुसार, तिसरा डोस घेतल्यानंतर लसीचा प्रभाव 52% पासून ते 88% पर्यंत वाढतो. लसीच्या तिसऱ्या डोसनंतर ओमायक्रॉनची प्रकरणे गंभीर स्वरुप धारण करत नाहीत. लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा धोका देखील 81% पर्यंत कमी होतो. 5 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील हॉस्पिटलाइजेशनची गरज पडत नाही.

संशोधकांनी म्हटले आहे की, ज्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे लक्षणे दिसतील, त्यांना बूस्टर डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 68% कमी राहतो.

कोवीशील्डचे दोन डोसही ओमायक्रॉनच्या विरोधात प्रभावी नाही
अभ्यासात खुलासा झाला आहे की, भारतात दिल्या जाणाऱ्या कोवीशील्डचे दोन डोसही ओमायक्रॉनच्या विरोधात प्रभावी नाहीत. कोवीशील्डच्या दुसऱ्या डोसच्या 5 महिन्यानंतरच शरीरात कोरोनाच्या विरोधात इम्यूनिटी कमी होते. तर फायझर आणि मॉडर्नाच्या दुसऱ्या डोसने वाढलेली इम्यूनिटी 6 महिन्यानंतर 70% वरुन 10% वर येते.

error: Content is protected !!