आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण; सध्या लॉकडाउनचा कुठलाही विचार नाही, पण…..

0 316

Corona Third Wave Lockdown : मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या काल झालेल्या दोन तासाच्या बैठकीमध्ये कुठेही लॉकडाऊनच्या विषयाची चर्चा नाही. पण जरुर निर्बंध वाढवले पाहिजेत. ज्यावेळी ७०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळेस ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होईल,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वार काढलं आहे. दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातारण आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नसल्याचं सांगितलं. पण कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा ११ ते १२ हजारांच्या दरम्यान असेल. सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचे रुग्ण यांच्यातले प्रमाण कळणे महत्त्वाचे आहे. राज्यात निर्बंध लागू केलेले आहेत, पण त्याची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. निर्बंध लावणे हे पहिले पाऊल आहे. सध्या लॉकडाऊनबाबतचा कोणताही विषय नाही. लहान मुलांच्या लसीकरण मोहीमेला सुरुवात करणे हे महत्त्वाचे आहे.

तर निर्णय घेऊच!
लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. जान है तो जहान है. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, यालाच आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.

आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे. मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरुन नियंत्रणात आलं, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!