सकल स्त्री संत गाथाचे पारायन आणि अखंड हरिनाम सप्ताह होणे गरजेचे : डाॅ. सदानंद मोरे 

डाॅ.शिवाजीराव मोहीते यांनी संपादित केलेल्या 'सकल स्त्री संत गाथा' या ग्रंथाचे प्रकाशन 

0 135

दिनेश कुऱ्हाडे
आळंदी,दि 10 ःमहाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांची भूमिका मोलाची ठरली असून जातीभेदाच्या भिंती पाडून संतांनी राष्ट्र उभारणीचे काम केले आहे. या संतांच्या मांदियाळीत स्त्री संतांची कामगिरी वगळून चालणार नाही. स्री संतांनी समाजाला पंरपरेतून परिवर्तनाकडे नेण्याचे काम केले,स्त्री संतांचे पैलू अनेकदा वेगववेगळ्या मार्गाने उलगडत जातात.रोजच्या जीवनशैलीतून त्यांनी समाज घडवण्याचे काम केले आहे.त्यात बहिणाबाई, जनाबाई यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, सकल स्री संत गाथाचे पारायन आणि अखंड हरिनाम सप्ताह होने गरजेचे आहे. असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,श्रीक्षेत्र आळंदी आणि पार्थ प्रकाशन,सांगवी यांच्या सयुंक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी विश्वस्त डाॅ.शिवाजीराव मोहीते यांनी संपादित केलेल्या ‘सकल स्री संत गाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि आमदार दिलीप मोहीते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
किर्तन एक भक्ती प्रकार आहे,लोकजागृतीचे साधन.कीर्तन म्हणजे भक्तीविषयक निरूपण. आत्मकर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी कीर्तनाचा उपयोग होतो वारकरी कीर्तन कसे असावे यासाठीचा अभ्यास संत ज्ञानेश्वर-नामदेवांपासून एकनाथ-तुकोबा-निळोबा यांच्यापर्यंतच्या वारकरी संतांच्या अभंगांतूनच घ्यावा लागेल, सध्याच्या काळात अनेक महाराज मंडळी स्वतःला अनेक उपाधी लावून कीर्तने,प्रवचने करतात, ‘विनोदाचार्य’ निर्माण होणे ही कीर्तन परंपरेची अधोगती आहे असे मत आमदार दिलीप मोहीते यांनी आळंदी येथे ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात केले.
बिग बॉस सारख्या कार्यक्रमात महिला कीर्तनकाराने जावे हे योग्य नाही यावर या क्षेत्रातील अभ्यासू महाराज मंडळी बोलत नाही हे दुर्दैव आहे असे मत संत साहित्याचे अभ्यासक डाॅ.कल्याणी हार्डिकर यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,विश्वस्त अभय टिळक,पालखीसोहळा मालक बाळासाहेब पवार,डाॅ.कल्याणी हार्डिकर,पुणे महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक,हभप राजाभाऊ चोपदार,डाॅ.शैलजा मोळक,हभप डाॅ.नारायण महाराज जाधव,हभप चैतन्य महाराज लोंढे,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले,प्रा.सुलभा मोहीते,सतीष साठे,संतोष कोंडेकर,नगरसेवक प्रकाश कु-हाडे,अशोक उमरगेकर,हभप मनिलाल काका, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,सचिन घुंडरे,सतिश कु-हाडे उपस्थित होते.

error: Content is protected !!