जि.प.प्रा.शा.कुंडीला यावर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार
सेलू ( नारायण पाटील )
दरवर्षी देण्यात येणारा जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार 2023-24 यावर्षी तालुक्यातील कुंडी येथील जी प प्रा शाळेला मिळाला असून आज परभणी येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे स्वीकारताना आमचा संपूर्ण शिक्षक स्टाफ , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. कोकिळाताई मोगल ,सदस्या सौ. गीताताई कटारे, सौ.सुरेखाताई मोगरे..
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नांदखेडा रस्त्यावरील भाग्यलक्ष्मी लॉन्स येथे बुधवार 3 जानेवारी रोजी उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार-2023, गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव (डाएट) प्राचार्य अनिल मुरकुटे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य. परीक्षा मंडळ, छत्रपती संभाजी नगरच्या सचिव वैशाली जामदार, सहसचिव प्रिया राणी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव, कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, प्रकल्प संचालक व्ही. के. मुंढे आदींची उपस्थिती होती. तसेच
कुंडी येथील जी प पट शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कोकिळताई मोगल ,सदस्या गीताताई कटारे ,सुरेखाताई मोगरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी हा पुरस्कार स्वीकारला .पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेचे व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .