शक्तिपीठ महामार्गाविरोधात मुंबईत धडकले हजारो शेतकरी

0 20

मुंबई,दि 12 ः
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. ठेकेदाराला पोसण्यासाठी तयार केला जाणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या पोटावरून जाऊ देणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेत बुधवारी (ता. १२) मुंबईतील आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे प्रमुख गिरीश फोंडे, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत.

महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाला ग्रीन सिग्नल दिला आहे. हा महामार्ग कोल्हापुरातूनच जाणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे, कोल्हापुरातून या महामार्गाला कडाडून विरोध होत आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ‘ वेगळ्या विषयांमध्ये अडकलो तर आपल्या अंगावरून शक्तिपीठ महामार्ग जाणार, शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी एकजुटीने संघर्ष करायला पाहिजे’ असं म्हणत एल्गार केला आहे.

शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थित राहत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी एकजुटीने संघर्ष करायला पाहिजे असा एल्गार पुकारला.

“या प्रस्तावित महामार्गामुळे ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचे समाधान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने बळजबरी करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेऊ नये, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

माझ्यावर विश्वास ठेवू नका, जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

जयंत पाटील म्हणाले की, सरकार नवे नवे रस्ते करण्यात का इंट्रेस्ट घेत हे कळत नाही. राजू शेट्टी यांना माहित आहे की, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आहे. विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्यांचा उपजिविका संपून जाईल. इकडे तिकडे असं करू नका. आम्ही भाषण करुन दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आला आहात, तर निर्धार टिकला पाहिजे. मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ठराविक चार सहा व्यक्तीना ट्रेंडर दिले जाते. आमचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे खात्री वाटतं नाही लोक ऐकतील की नाही. आपण यात विसरून जातो की अंगावरुन शक्तिपीठ जात आहे.

माझ काही खर नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका

जयंत पाटील मोर्चाला संबोधित करत असताना माझ काही खर नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य केल्याने भूवया उंचावल्या. माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाहीत. आपली एकी कायम ठेवा संघर्ष करायला ठाम रहा,  मोजणीला अटकाव करा. आमचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही बोलायचं हळूहळू कमी झालो आहे. कारण बोलून लोकांना काही समजत नाही. दुसरचं हिंदुत्व वैगरे समोर असतं, पण तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल. राजू शे्ट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझ काही खरं नाही, माझा सल्ला शेट्टी ऐकत नाही, नाही तर ते आज खासदार झाले असते, असे ते म्हणाले.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या आहेत. लवकरच जिल्ह्याव्यापी मेळावा होणार आहे. 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा होणार आहे. तसंच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्व मंत्र्यांना जिल्हाबंदीचा दिला इशारा दिला आहे.

error: Content is protected !!