नियमित अभ्यासातून ध्येयपूर्तीचा आनंद बहुगुणित करावा-अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे
केज ( दि.4 जानेवारी)
नियमित अभ्यास करून आपल्या ध्येयपूर्तीचा आनंद बहुगुणित करावा व आपल्याला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर जन्मदात्री माता आणि अन्नधान्य पुरविणारी माती यांचे संवर्धन आणि जतन केल्यावरच आपला सर्वांगीण विकास साधला जाणे शक्य आहेअसे मत शासकीय कृषि महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी व्यक्त केले .
ते आज उंदरी ता. केज या ठिकाणी झालेल्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. उंदरी गावातील ज्ञानराज विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा नंदकिशोर ठोंबरे हिने अत्यंत खडतर समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरराव ठोंबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री सुंदरराव आदमाने सर ,राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त माजी पोलीस निरीक्षक सय्यद रहेमान साहेब, उंदरीचे सरपंच सुदाम पाटील उपस्थित होते .यावेळी बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही कु. प्रतीक्षाहीने अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये सी ए होण्याचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल तिचे कौतुक करत तिच्या आई-वडिलांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रेहमान साहेब यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की या स्पर्धेच्या युगात मोबाईल वरील व्हाट्सअप पाहून कोणीही यश मिळू शकत नाही त्यासाठी वाचन संस्कृती टिकली पाहिजे.संस्थेचे सचिव आदमाने सर यांनी याप्रसंगी बहुमोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी कर्मवीर डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने श्री.जनार्दन ठोंबरे पाटील आणि श्री रामराव ठोंबरे पाटील यांनी प्रतीक्षा चा सन्मान केला
या कार्यक्रमाच्या मुख्याध्यापक अरुणराव ढाकणे ,उपसरपंच दीपकराव सोनवणे , विद्यालयाचे शिक्षक श्री निर्रडे, श्री गोविंद सोळंके,
श्री विलास ठोंबरे , श्री दीक्षित, तसेच उंद री गावातील प्रतिष्ठित नागरिक भारत कुरवडे गुरुजी, बिभीषण ठोंबरे, प्रभाकर ठोंबरे तसेच गावातील शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री विवेक चव्हाण यांनी केले.