गुरुवारी श्री शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
परभणी (२४) येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार (दि.२७) रोजी छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार, द्वितीय पारितोषिक पंचविशे तर तृतीय पारितोषिक पंधराशे रुपये आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.
सदरील स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष किट्टेकर,प्रबंधक विजय मोरे, समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे यांच्या उपस्थितीत होणार आहे.ही स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. अभिजात दर्जा प्राप्त मराठीसाठी शासन, साहित्यिक व माझी जबाबदारी, माणुसकी पेरावी म्हणतोय !, भारतीय संविधानाची ७५ वर्षे, नवीन शैक्षणिक धोरण संधी व आव्हाने, प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज आदी विषयांवर स्पर्धक आपले मत मांडतील.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे यांनी केले आहे.