कान्हेगाव शिवारात वाळुची दोन टिप्पर जप्त

0 86

पूर्णा/प्रतिनिधी
येथील महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील कान्हेगांव शिवारात अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असलेल्या ठिकाणांवर छापेमारी करुन वाळूने खचाखच भरलेली २ टिप्पर ताब्यात घेऊन सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन येथील तहसील कार्यालयात जमा केला आहे.ही कार्यवाही शनिवार दि.१० फेब्रु रोजी मध्यरात्री ना.त.प्रशांत थारकर यांच्या पथकाने केली आहे.
पूर्णा तालुक्यात वाहणा-या पूर्णा व‌ गोदावरी नदीच्या पात्रातून मागील काही दिवसांपासून जेसिबी,गाढवे, सेक्शन पंप,तराफे टाकून वाळूचा बेसुमार उपसा करून त्याची चोरटी वाहतूक केली जात आहे.यावर कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,यांनी तहसीलदार मावधराव बोथिकर, तसेच ना.त.प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखाली पथके स्थापन केली आहेत.या दोन्ही पथकाने शुक्रवारी पिंपळगाव (बा), लक्ष्मणनगर येथे संयुक्त कारवाई करत ७ टिप्पर जप्त केली होती. दुस-या दिवशी थारकर यांनी गोपनीय माहिती काढून मंडळ अधिकारी खाडे,अनुप सावरकर, नंदकुमार शेलाटे यांच्या पथकास सोबत घेऊन तालुक्यातील कान्हेगांव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक होत असलेल्या ठिकाणी छापा घातला. शनिवारी मध्यरात्री यापथकाने एम.एच-०४/ईएल/६८८५, एम. एच-१४/एएच/६९०२ या दोन टिप्परला पाठलाग करत पकडले.वाळू सह पकडण्यात आलेल्या दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केले आहेत.त्या दोन्ही वाहनांना मिळून तहसीलदारांनी सुमारे ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे थारकर यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!