उगाव विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
निफाड, रामभाऊ आवारे –
महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालय उगाव येथे गुरूवार, दिनांक 14 एप्रिल रोजी ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’, विश्वरत्न-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास गवळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी श्री बी एस आव्हाड सरांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक, राजकिय संघर्षाची व त्यातून समता- बंधुता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. डॉ.आंबेडकरांच्या आयुष्यातील अनेक उदाहरणे देत त्यांच्यातील बोधिसत्वाची व महामानवाची ओळख उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.