पोखर्णी येथे गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा
परभणी,दि 16ः
पोखरणी नृसिंह येथील स्वराज्य प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळातर्फे लहान मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्पर्धेमध्ये संगीत खुर्ची लिंबू चमचा बॉटल भरणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन मंडळामार्फत करण्यात आले या स्पर्धा पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात घेण्यात आल्या स्पर्धेच्या आयोजनासाठी स्वराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य बक्षीस म्हणून देण्यात आले.बक्षीस वितरण मंडळातीळ सदस्यांमार्फत करण्यात आले.