स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक शिक्षण महत्त्वाचे-प्रा.गजानन जाधव
सेलू ( प्रतिनिधी )
श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस स्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत व्यवसाय शिक्षण मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. संजय रोडगे,प्रमुख उपस्थिती प्राचार्य गजानन जाधव , शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर व शिक्षकवृंद उपस्थित होते.
उज्जवल भविष्य व स्वप्नपूर्ती साठी व्यवसायिक शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे.तसेच दहावी , बारावी नंतर क्षेत्र निवडण्याबद्दल देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व्यवसायिक शिक्षण संदर्भात व्याख्या, विविध व्यवसायांचा सहभाग ,शिक्षणाच्या नियम व अटी,योग्य व प्रभावी क्षेत्र , महाविद्यालय याबद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र जाधव यांनी केले.