गुंज येथील प. पु. चिंतामण महाराज माध्यमिक विद्यालयाचे यश
पाथरी,दि 16 ः
पाथरी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024 25* “साई क्रीडा मंडळ पाथरी” या ठिकाणी खोखो,कबड्डी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प. पु. चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालय गुंज खुर्द विद्यालयातील 14 वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने कबड्डीमध्ये शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी या संघाला पराभूत करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली तसेच याच विद्यालयाचे 17 वर्षे वयोगटातील मुलाच्या संघाने नेताजी सुभाष विद्यालय पाथरी या संघाचा दारुण पराभव करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले त्याबद्दल प्रशिक्षक श्री गिरी सर व विजयी खो-खो संघाचे प्रशिक्षक महेंद्र धर्मे(नाना) व विजयी संघाचे मनापासून अभिनंदन तसेच विजयी संघाने या विजयाचे श्रेय श्री दयानंदभाऊ मोदानी व संस्थेचे अध्यक्ष श्री परमानंदजी मोदानी तसेच सचिव श्री रामवल्लभजी पोरवाल व इतर पदसिद्ध संस्थेचे सदस्य श्री दगडुआप्पा पटणे, श्री ज्ञानोबा नेमाने,श्री यशवंत देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व पालक यांना दिले. आणि लाडके गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड तसेच साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष श्री धनले सर व तालुका क्रिडा संयोजक श्री शेळके सर यांनी विजयी संघाना शुभेच्छा दिल्या.