इंधन दरवाढीच्या विरोधात वर्धा जिल्हा विकास आघाडी आंदोलन करणार

0 66

हिंगणघाट,दि 28 (प्रतिनिधी)ः
आज देशात शेतकरी कष्टकरी गरीब, मजूदर वर्ग हा देशोदडीला लागलेला आहे, कारण केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणा मुळे पेट्रोल ,डिझेल व गॅस च्या किमती गगणाला भिडल्या आहे,सर्व सामान्य जनता यात होरपडून गेलेली आहे हा महागाईच्या भस्मासुरामुळे अनेक कुटुंब प्रमुख आत्महत्या च्या मार्ग अवलंबीत आहेसर्व सामान्य जनतेला खाद्य तेल पासून गहू, तादूळ भाजीपाला, अशा अनेक वस्तुचे दर गगणाला भिडले आहे,यावर केन्द्र सरकार व राज्य सरकार चुपी साधुन आहे त्यावर बोलायला व निर्णय घ्याला वेळ नाही अशीच माहागाई वाढत राहीली तर जनता पेटून उठेल, व त्याचा परिणाम देशाला व राज्यला भोगावा लागेल तरी त्यावर त्वरीत तोडगा काढला नाही तर वर्धा जिल्हा विकास आघाङी रस्तावर ऊतरून आदोलन करण्यात येईल असा ईशारा कामगार नेते डॉ उमेश वावरे(वैज्ञानिक) यानच्या नेतृत्वात आज निवेदन मा, प्रधानमंत्री भारत सरकार ,मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा पेट्रोलियम व गॅस मंत्री भारत सरकार याना मा उपविभागीय अधिकारी यानच्या मार्फत देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, गुरुदेव साबळे, प्रदिप कोल्हे, देवेन्द्र त्रिपल्लीवार, जिवन उरकुडे, अरूण काळे, चारू आटे, धिरज बालपाडे, प्रदिप मानिकपूरे इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते.

error: Content is protected !!