बालकांच्या संरक्षणासाठी एकत्रित काम करावे.- हांदेश्वर

3 16

 

पाथरी,दि 24 ः
संकल्प मानव विकास संस्थेने रुद्रा पॅलेस येथे बालकांच्या संरक्षणा साठी काम करणाऱ्या यंत्रणेची तालुकास्तरीय बैठक घेतली.

 

बैठकीसाठी तालुका बाल संरक्षण समिती चे अध्यक्ष तथा तहसिलदार  शंकर हांदेश्वर, एकात्मिक बाल विकास अधिकारी मंगल गायकवाड, शिक्षण विभागाचे थोरेर, आरोग्य विभागाचे डॉ. सुरवसे , पंचायत समिती विभाग श्री रेवनवार  श्री शिरसाठ  तालुका विधी सेवा समिती चे साबळे सर, मुळे  उपस्थित होते.परभणी जिल्ह्यातील बालविवाह, बालकामगार व बालकांवर होणारे अत्याचार या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवून संकल्प मानव विकास संस्थेने बाल संरक्षण यंत्रनेच्या समन्वयाने काम करण्याची गरज आहे. म्हणून कार्यक्षेत्रतीलपाथरी तालुक्यातून हजारो मजूर ऊस तोडणी व वीटभट्टीला स्थलांतरित होतात. त्यांच्यासोबत 0 ते 18 वयोगटातील मुलं स्थलांतरित होतात त्यामुळे त्यांचे शिक्षण व संरक्षण बाधित होत आहे म्हणून संकल्प संस्था सातत्याने स्थलांतरित बालकांच्या शिक्षणासाठी हंगामी वस्तीग्रह, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी प्रतिबंध आणि बाल अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी काम करत आहे.

या कामात समुदायाचा, मुलांचा, शासकीय समिती आणि तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी यांच्या सहभागाने बाल संरक्षणाची मोहीम राबवत आहोत त्याचाच भाग म्हणून पाथरी तालुकास्तरावरील बाल संरक्षणाच्या संबंधी अधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक आयोजित करण्यात आली आहे असे संकल्प संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक विठ्ठल साळवे व समन्वयक सावंन जोंधळे यांनी तालुक्यातील बालकांच्या समस्या मांडल्या आणि शासकीय यंत्रणा व एनजीओ यांच्या समन्वयाची गरज आहे असे मत मांडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक बालासाहेब खोपे, सेंटर इन्चार्ज शामल शेरकर, उमेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.या सर्वांचे आभार रामभाऊ हिवाळे यांनी मानले

error: Content is protected !!