वेडसर महिलेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

0 1

सेलू ( प्रतिनिधी )
वेडसरपणाच्या नादात विहिरीत उडी मारून पाण्यात बुडाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि १७ जानेवारी रोजी घडली
तालुक्यातील धनेगाव येथील महिला सारिका प्रमोद जीवने हिने वेदसरपणाच्या नादात दि १७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धनेगाव शिवारातील विलास सुखानंद कटारे यांच्या विहिरीत उडी मारल्यामुळे पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला .गेल्या दहा वर्षांपासून तिच्यावर मनोरुग्ण असल्यामुळे उपचार चालू होते .व वेदसरपणामध्ये तिचे विहिरीत उडी मारून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर मृत महिलेचा भाऊ सखाराम प्रमोद जिवणे याने सेलू पोलिसात दिल्यावरून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशानुसार आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे .पोलीस हवालदार जानगर पुढील तपास करीत आहेत .तीन महिन्यापूर्वीच मयत महिलेचा पिता प्रमोद जिवणे यांचे साप चावल्याने दुःखद निधन झाले आहे .व त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्या मुळे जिवणे परिवारावर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला आहे .रीतसर पंचनामा व शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले .

error: Content is protected !!