धुळ्याची लाडकी बहीण काय म्हणाली? पैसे सरकारने परत घेतले नाहीत, तर…
: धुळ्यातील अपात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरून सरकारने पाच हफ्त्याचे ७५०० रूपये परत घेतल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रात खळबळ उडाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. धुळ्यातील नकाणे येथील महिलेचा अर्जाची तक्रार आल्यानंतर राज्य सराकरने कारवाई करत पैसे माघारी घेतल्याचं वृत्त समोर आले होते. पण आता यामध्ये वेगळेच वास्तव समोर आलेय. लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने परत घेतले नाहीत, तर त्या महिलेनेच परत दिलेत.
धुळ्यातील खैरनार या महिलेकडून सरकारने ७५०० रूपये परत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याच लाडक्या बहिणीने त्याबाबतचे खरे वास्तव सांगितलेय. सरकारने पैसे परत घेतले नाहीत. तर त्यांनीच सरकारला पैसे परत दिले. अर्ज भरताना चुकून मुलीचे आधार कार्ड देण्यात आले होते. त्यामुळे मुलाच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते. त्यामुळे आम्ही बालविकास विभागात संपर्क करत पैसे जमा केले. तो अर्ज क्रमांक आता बाद झाला. पैसे जमा केल्यानंतर आम्ही पुन्हा अर्जाची कागदपत्रे जमा केली असून मला लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. खैरनार यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
धुळ्याची लाडकी बहीण काय म्हणाली?
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. सर्वांना पैसे आले पण मला आले नव्हते. मुलाला पाहायला सांगितले. त्याचं आधार कार्ड माझ्याकडून चुकीनं गेल्याचं मुलाने सांगितले. त्यानंतर आम्ही मुलाचे खातं तपासले तेव्हा त्याच्या खात्यावर पाच हफ्त्याचे पैसे आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आम्ही बालविकास विभागात भेटायला गेलो. त्यांनी आम्हाला कलेक्टरकडे जाण्यास सांगितले.
कलेक्टरांना भेटल्यानंतर आम्ही अर्ज केला. त्यांनी दिलेली माहिती बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याला दिली.दुसऱ्या दिवशी आम्ही ते पैसे सरकारला जमा केले. सर्व पैसे आम्ही सरकारला दिले.. त्यानंतर नव्याने कागदपत्रे देत सुधारणा करून घेतली. मला लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. सरकारचे आम्ही आभारी आहोत, असे खैरनार यांनी सांगितले.
तिचा मुलगा मुलगा काय म्हणाला?
आपण या योजनेचे पैसे चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे स्वत:हून परत केले. आईचा अर्ज क्रमांक तो बंद झालाय. तिचे नव्याने कागदपत्रे जमा केले असून पैसे येण्यास सुरूवात झाली.