अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार का ? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

0 56

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा सुरू असताना आता माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.  या योजनेबाबत त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला. त्या म्हणाल्या आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना त्यांचे डॉक्युमेंट जाऊन मागितले नाहीत किंवा व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्या घरी गेलो नाही. ज्या भागातून तक्रारी आल्या तिथेच फेरतपासणी झाली आहे. कुठेही सरसकट फेरतपासणी झाली नाही.

‘वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून समज गैरसमज पहायला मिळत आहेत. आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे माघारी घेतलेले नाहीत. ज्या पात्र होतं नाहीत, त्या महिला पत्र पाठवून पैसे माघारी देण्याबाबत सांगत आहेत. दररोज पाच सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

पैसे परत घेणार की नाही?

वेगवेगळा कारणास्तव पैसे माघारी देण्यासाठी स्वइच्छेने अर्ज येत आहेत. आत्ता पर्यंत कुठलाही लाभ माघारी घेतलेला नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकटी योजना नाही, जिची स्क्रूटीनी होत आहे. सर्वच योजनानांची स्क्रूटीनी होत असते. कोणतीही योजना असली तरी तिची सालाबादप्रमाणे स्क्रुटीने किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोणत्याही थेट लाभाची योजना त्याचं मूल्यमापन किंवा व्हेरिफिकेशन ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. यामध्ये वेगळं काही आहे असा भाग नाही. या योजनेला आतापर्यंत एक वर्ष ही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या योजनेतील काही जे वेगवेगळे समज गैरसमज आहेत ते होत आहेत. आम्ही आतापर्यंत एकही महिलेचे पैसे घेतलेले नाहीत. काही महिलांनी स्वतःहून शासनाला रिक्वेस्ट केलेले आहे. मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्यामुळे आता मी या योजनेसाठी पात्र होत नाही, अशा पद्धतीच्या अर्ज केले असतील तर हा वेगळा भाग झाला. मात्र, अद्याप या योजनेअंतर्गत येणाऱ्या महिलांच्या पैसे परत घेतलेले नाहीत आणि स्क्रुटीनीमध्ये कोणाचे नाव परत घेण्याचे परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णय अद्याप विभागात किंवा शासनाने घेतलेला नाही किंवा त्याबाबतची चर्चा झालेली नाही किंवा निर्णय देखील झालेला नाही, अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे.

साडेतीन-चार हजार आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील, पण त्याच्यामध्ये कोणत्याही लाभार्थ्याचे पैसे परत घेतलेले नाहीयेत. रोज यामध्ये वाढ होत आहे ,आम्ही याबाबतचे अर्ज मागवून घेतलेले नाहीत. ते स्वतःहून आलेले आहेत. ज्यांनी लाभ घेतलेला आहे पण त्यांना आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेला आहे, आपण अपात्र आहोत ते स्वैच्छने पुढे येत आहेत आणि अर्ज करत आहेत. आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवली नाही, ज्यावेळी पैसे माघारी पाठवायचे असतात, ते सरकारी तिजोरीत जमा होत असतात. नियोजन विभाग पैसे जमा करण्यासाठी विंडो तयार करून देतील, तिथं पैसे जमा होतील. आम्ही कुणाचे पैसे स्वतःहून घेणार नाही, जे स्वत हून देतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी माहितीही तटकरेंनी दिली आहे.

error: Content is protected !!