महाराष्ट्रात असा होणार अनलॉक ?
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (corona) संकटाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर राज्यात (state) लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये (strict restrictions) टप्प्याटप्प्याने शिथिलता (stepwise relaxation) आणली जाण्याची शक्यता (possibility) आहे आणि यावर विचार (consideration) केला जात आहे. मात्र एकाच वेळी सर्व नियम (rules) न हटवता हळूहळू कमी केले जाणार आहेत.
कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. ‘१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
१ जूनपासून राज्य सरकार काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानदारांना सकाळी ७ ते ११पर्यंत दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात हे निर्बंध मागे घेण्यात येऊन पूर्ण दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात उपहारगृहे, हॉटेल आणि दारूच्या दुकानांचा कारभार सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तर चौथ्या टप्प्यात लोकल सेवा आणि धार्मिक ठिकाणे उघडण्यासही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू आहेत तिथे परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत.