कृषि क्षेत्रात महिलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी-कृषिभूषण मेघा देशमुख

0 68

परभणी / प्रतिनिधी – शेती चा शोध स्त्रीने लावला असला तरी इतर क्षेत्रा प्रमाणे कृषि क्षेत्रात ही पुरुषांची मक्तेदारी दिसून येते.ग्रामीण भागातील महिला पुरुषांच्या बरोबरीने शेतात काम करत असल्या तरी त्या आपली स्वतंत्र ओळख निर्माण करु शकल्या नाही. अलिकडच्या काळात कृषि क्षेत्रात महिलांनी आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे.कृषि क्षेत्रात राबताना महिलांनी प्रामाणिक परिश्रमाच्या बळावर प्रसंगावधान राखत , सूत्रबद्ध नियोजनाच्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे , काटकसरीने खर्च करत शेती उत्पादनात भरच घातली.मी कृषिभूषण कांतराव देशमुख यांची लेक या नात्याने त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली शेतीत वेगवेगळे प्रयोग करु शकले .आज प्रत्येक महिलेने कुटुंबा सोबत राहातं.घरकामा बरोबरच शेती कामातही अधिक जबाबदारीनं पाऊल टाकत जगन्याचा मार्ग अधिक सुकर आणि समृध्द करावा असे आवाहन कृषिभूषण मेघा देशमुख यांनी केले.

कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी च्या राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मेघा देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांचे मार्गदर्शना खाली कार्यक्रम घेण्यात आला.
राजमाता जिजाऊ माॅ साहेब, आणि कै.सौ‌.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अभ्यास क्रेद्राच्या समन्वयक प्रा.डॉ.संगीता लोमटे यांनी प्रास्ताविक केले.उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ.नसिम बेगम,प्रा.परमेश्वर यादव यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!