तुम्ही या आणि स्वत: सांगा, मी मुख्यमंत्रिपद सोडतो….ठाकरेंचं बंडखोरांना आवाहन

0 192

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आताच्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना मी मुख्यमंत्री हवा नसेल तर राजीनामा देतो, असं थेट सांगितलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर देखील भाष्य केलं…

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

कोरोना काळात प्रसंग बाका होता. मला प्रशाससनाचा अनुभव नव्हता. कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं, मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. मला जे करायचं होतं ते मी प्रमाणिकपणाने केलं. त्यादरम्यानच्या काळात जे सर्व्हे होत होते त्यामध्ये देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची गणणा केली गेली. मी आज कोविडचा विषय घेऊन आलेलो नाही. काही मुद्दे आपल्यासमोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? मुख्यमंत्री भेटत का नाही? मुख्यमंत्री भेटत नव्हते.मुख्यमंत्री म्हणजे मी. हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरची दोन-तीन महिने हे फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हते. म्हणून त्या काळात मुख्यमंत्री भेटू शकत नाही ते बरोबर होते. मी माझी पहिली कॅबिनेट मिटिंह ही रुग्णालयातून अटेन्ड केली होती.

शिवसेना आणि हिदुत्वाची घट्ट नाळी आहे. शिवसेना कदापि हिंदुत्वाशी आणि हिंदुत्व शिवसेनेसोबत दूर होऊ शकत नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. म्हणून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि काही आमदार-खासदार अयोध्येला जावून आले. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे आता बोलण्याची वेळ नाही. शिवसेना कुणाची आहे? काही जण असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. मी असं काय केलंय की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर चालली आहे.

माझ्यासोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे सहकारी आहे ते बाळासाहेबांच्या काळाचीलच सहकारी आहेत. मधल्या काळामध्ये जे काही मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा. सध्या राज्यात काय चाललं आहे. राज्यातील काही शिवसेनेचे आमदार गायब. गेले कुठे? पहिले सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले. आता त्यातील काही आमदारांचे आम्हाला फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचं नाही. काल-परवी जी निवडणूक झाली. त्या निवडणुकींनंतर आमदार हॉटेलमध्ये होते. तेव्हा मी ज्यांना आपण आपलं मानतो, शिवसैनिक मरमर राबतात निवडून देतात आणि आपल्याच माणसाला एकत्र ठेवावं लागतं. मध्येच कुणीतरी गायब होतं. बाथरुमलाही गेलं तरी शंका. अशी लोकशाही मला आवडणारी नाही.

मी पद सोडायला तयार आहे – उद्धव ठाकरे

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी दोन्ही पद सोडायला तयार आहे. पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मना आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको. समोर या आणि सांगा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो – उद्धव ठाकरे

शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नको. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो. जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगदिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

error: Content is protected !!