मोटारसायकलच्या धडकेत अपघातात युवकाचा मृत्यू

0 13

पूर्णा,दि 12 ः
तालूक्यातील पांगरा -पूर्णा रोडवर तरंगल शिवारात ता.१२ जानेवारी रविवार रोजी सकाळी ९:३० वाजे दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होत भिषण अपघात झाला.या अपघातात डोक्याला जबर मार लागून पांगरा येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

या भिषण अपघाता विषयी अधिक माहिती असी की,पूर्णा तालूक्यातील पांगरा ते पूर्णा रोडवर ता.१२ जानेवारी रविवार रोजी पांगरा तर्फे लासीना येथील युवक शेतकरी अर्जून दशरथ ढोणे (वय ३९) हा आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच २२ एल ५३२५ वरुन गावाजवळील एका शेतकऱ्याचा ऊस तोडून मोळ्या बांधण्यासाठी शेतातील अखाड्यावर वास्तव्यास असलेल्या पत्नीला ऊस फडाकडे घेऊन येण्यासाठी पांगरा गावाकडून पूर्णा दिशेकडे अखाड्यावर जात होता.त्या दरम्यान तो पांगरा-पूर्णा रोडवर असलेल्या रमाकांत ढोणे यांच्या शेताजवळ येताच पूर्णेकडून पांगरा गावाच्या दिशेने पांगरा येथीलच कृष्णा गोविंद चव्हाण हा त्याच्या मोटारसायकल क्रमांक एम एच २२ ए वाय ६३६१ वरुन दारुच्या नशेत तर्र होवून सोबत खिशात दारुच्या बाटल्या भरून टिबलसीट भरधाव वेगाने येवून राईट साईड जावून त्याच्या गाडीने लेफ्ट साईडने जाणा-या एम एच २२ एल ५३२५ या मोटारसायकलला जोरदार धडक देऊन उडवले.या भिषण अपघातात गाडीवर स्वार असलेल्या अर्जून दशरथ ढोणे यांच्या डोक्याला व शररिराला जबरदस्त मार लागून तो गंभीर जखमी झाला.दरम्यान, पथदर्शीनी नागरीकांनी सावधगिरी बाळगत त्यास तात्काळ नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.या दरम्यान अतिगंभीर प्रकृती असलेल्या अर्जून दशरथ ढोणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुंडे,काकडे हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी पंचनामा केला.पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर करत आहेत.अपघातात अर्जून ढोणे हे मृत्यू पावलेल्यामुळे पांगरा गावावर एकच शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!