संसदेत घडलेल्या घटनेतील तरुण मराठवाड्यातील….वाचा सविस्तर

0 292

लोकसभेचं कामकाज सुरु असताना अचानक गोंधळ झाला. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. एका महिलेला आणि महाराष्ट्रातील एका तरूणाला अटक झाली आहे. अमोल शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. अमोल लातूरमधील झरे गावचा आहे. तर हरियाणातील महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. नीलम कौर सिंह असं या अटकेत असलेल्या महिलेचं नाव आहे. हरियाणातील हिसार शहरातील ही महिला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

 

भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे झाल्याच्या कटू आठवणीदिवशीच आज संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य चूक घडली आहे. लोकसभेत शून्य प्रहरात पश्चिम बंगालमधील भाजप खासदार खगेन मुर्मू बोलत होते. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीतून दोघे उडी मारून संसदेतल्या बाकांवरून इकडून तिकडे पळत होते. घुसखोरांनी बुटातून स्मोक कँडल आणलं होतं. त्यांनी लोकसभेत पिवळ्या रंगाचा गॅस फवारला. यावेळी लोकसभेत एकच गोंधळ उडाला. सुरक्षासक्षकांसह आजूबाजूचे खासदारही घुसखोरांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्रातील लातूरच्या अमोल शिंदे याने कँडल स्मोक जाळून संसदेबाहेर खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला. अमोलच्या साथीला हरियाणाच्या हिसारची रहिवासी असलेली ४२ वर्षीय नीलम सिंग देखील होती. दरम्यान, संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू, असं आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलं.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाज सुरू आहे. शून्य प्रहरादरम्यान पश्चिम बंगालमधील भाजप खासदार खगेन मुर्मू बोलत असतानाच प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी अचानक सभागृहात उड्या मारल्या. तिथल्या बाकांवरून इकडून तिकडे उड्या मारू लागले. सभागृहात एकच गोंधळ झाला. लोकसभेच्या पिठासीन अधिकाऱ्यांनी लोकसभेचं कामकाज काही वेळाकरिता स्थगित केलं. दरम्यान, आजूबाजूच्या खासदारांनी घुसखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी घुसखोर सागर शर्मा याला सर्वप्रथम पकडून सुरक्षारक्षकांच्या हवाली केलं. सुरक्षारक्षकांनी देखील तातडीने दुसऱ्या घुसखोराला पकडून सभागृहात बाहेर नेलं. दोघांनी म्हैसूरच्या भाजप खासदाराकडून पास घेऊन संसदेत प्रवेश मिळविल्याचं समोर आलं आहे. सध्या घुसखोरांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!