युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव, सिनेगायक आदर्श शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी

0 44

 

परभणी – भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने आज ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, परभणी शहरात विष्णु जिनींग मैदानावर युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव ,महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे यांची भव्य भीम गीत संगीत रजनी पार पडणार आहे. या महोत्सवाचे आयोजन डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे , (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी , हे महोत्सवाचे १६ वे वर्ष आहे.महोत्सवाचे उदघाटन मा.मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.के.राजू (राष्ट्रीय समन्वयक काँग्रेस एससी/ एसटी /ओबीसी ,अल्पसंख्याक विभाग) यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.राजेश लिलोटिया (अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग) , मा.मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, आ. सुरेशराव वरपुडकर (जिल्हाध्यक्ष काँग्रेस परभणी), मा. खासदार तुकाराम रेंगे पाटील , मा. आमदार सुरेशदादा देशमुख , मा. संजय राठोड (उपाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) , मा. सुरेश नागरे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांची उपस्थिती राहणार आहे .
अभिवादन सोहळ्या प्रसंगी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो ,(महासचिव अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र प्रदेश) व भिक्खू संघाची धम्मदेशना होणार आहे.
दरम्यान १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या जयंती उत्सव समितीचा प्रथम , द्वितीय व तृतीय बक्षीस पारितोषिक देऊन मान्य वरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे .
या महोत्सव कार्यक्रमास शहर ,व जिल्ह्यातील समाज बांधव , महिला मंडळ युवा वर्गाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक तथा निमंत्रक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे , मिलिंद दादा सावंत, (सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी परभणी), सुधिर कांबळे ,( शहर जिल्हाध्यक्ष अनु.जाती विभाग), आकाश लहाने , मा.मनपा सदस्य ,चंद्रशेखर साळवे, उत्तम गायकवाड, प्रदीप जोंधळे, प्रा.राजेश रणखांबे, प्रा.डॉ. सुनिल तूरुकमाने, मंचक खंदारे , पंकज खेडकर, अमोल धाडवे, शशिकांत हत्तीअंबिरे, अविनाश मालसमिंदर,यांनी केले आहे.

error: Content is protected !!