अंबरनाथ तालुक्यातील कासगावात भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व चॉकलेटचे वाटप
बदलापूर, जाफर वणू – महाराष्ट्राला लाभलेली संताची परंपरा व महापुरूषांचे आशिर्वादरूपी संस्कार हे आजच्या आधुनिक युगातही खेड्यापाड्यात पाहायला मिळते. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराजवळील कासगाव या गावात अधिकमासाचे औचित्य साधून ग्रामस्थ व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष ह.भ.प. गणेश बाबू भोईर, सौ मनीषा गणेश भोईर यांच्या सौजन्याने ग्रंथपारायणाचे समापन गुरूवर्य ह.भ.प. महादू रामा झाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे तसेच महिला समन्वयक पूनम बोरगे व उपाध्यक्ष पद्माकर दुधकर, तनुजा मॅडम, मीनल भवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना महिला समन्वयक पूनम बोरगे यांनी कुठलाही बडेजाव न करता ही सामाजिक कार्य करता येतात हे आजच्या कार्यक्रमातून दिसून येत आहे. तसेच संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप करतांना विशेष समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मातापित्यांशिवाय या जगाची ओळख होऊच शकत नाही, मला माझ्या मात्यापितांनी जन्म दिला म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे, म्हणून आपल्याला वाटप केलेल्या वहीत आपल्या मात्यापित्यांचं नांव लिहा व मोठे करा असे प्रबोधनपर विचार भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी मांडले. उपस्थित ग्रामस्थांपैकी ह.भ.प. शिवाजी मंगल भोईर यांनी आमच्या घराण्यातील तीन पिढ्या भजनाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करत असून संस्थेच्या उपक्रमाचे मानावे तितके आभार कमी आहेत.
याप्रसंगी कासगाव या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर राऊत व चंद्रकांत भोईर व तनुजा विद्याधर महेश भोईर अभिषेक भगत रनजित मोहीते करन भोईर युवराज राऊत ह्यांच्यासह इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. आशी माहीती संस्थेचे सचिव मनी डांगे ह्यांनी दिली.