अंबरनाथ शहरातील पालकांना फि भरण्यास सक्ती केल्यास शाळांवर कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा – प्रितम शिसोदे

0 257

अंबरनाथ, जाफर वणू – कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भावामुळे संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये कोणत्याही शाळेने पालकांकडुन फि भरण्यास सक्ती करू नये अन्यथा आंदोलन करावे लागेल अशा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष अंबरनाथ महिला संघटक सौ. ज्योती गोपाळ शिसोदे ह्यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष प्रितम गोपाळ शिसोदे ह्यांच्यातर्फे गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग तहसीलदार, अंबरनाथ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

कोरोनासारख्या भयंकर रोगामुळे संपूर्ण देशात व राज्यभरात संचारबंदी तसेच दिनांक 22 मार्च पासून लॉकडाऊनची सूचना जाहिर करण्यात आल्यापासून सरकारने संपूर्ण देशात व राज्यात नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. या कोरोनासारख्या रोगाला संक्रमण होऊ नये. याकरीता सर्व काम धंदे बंद ठेवण्यात आले असून नोकरदार, व्यापारी, दुकानदार व लघु उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागले होते. तसेच या रोगामुळे स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी दैनंदिन गरजेच्या वस्तु व अन्नधान्यासाठी पैसे खर्च करने त्यात मुलांच्या शाळेचे फि भरण्याची अड़चण आली असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शाळेकडून पालकांना फी भरण्यास सक्ती करू नये अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश देण्यात आले आहेत. तरी सुद्धा अंबरनाथ शहरातील काही शाळा पालकांना फोन करून फी भरण्यास सक्ती करत असून पालकांना मानसिक त्रास देण्याचा ही प्रकार घडत आहे. यासाठी प्रत्येक शालेय पालक कमेटी असणे गरजेचे आहे. तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास अथवा पालकांशी कोणत्याही शाळेने फि भरण्यास सक्ती केल्यास आम्ही नागरिकांच्या हिताकरीता संबंधित शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा आणि नागरिकांवर होणारा अन्याय सहन करणार नसल्याचे प्रहार जनशक्ती पक्ष अंबरनाथ महिला संघटक सौ. ज्योती गोपाळ शिसोदे ह्यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष प्रितम गोपाळ शिसोदे ह्यांनी लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

error: Content is protected !!