आकाश महाडीक यांची पोलीस मित्र संघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड
मुंबई – पोलीस मित्र संघ पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी आकाश महाडीक यांची निवड करण्यात आली आहे.
महाडीक यांची निवड संस्थेचे संस्थापक सुरेश वालेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आली. माझ्यासाठी ही एक सोनेरी संधी आहे. पोलीस बांधवांना व भगिनींना त्यांच्या सामाजिक कार्यात मदत करेन. तसेच पोलीस मित्र संघटनेचा विस्तार करून दिलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडत संघटनेचे ध्येय, उद्दिष्टे, धोरणे मनात ठेवून जनतेच्या सेवेसाठी यशस्वी प्रयत्न करू असा विश्वास यावेळी प्रतिक्रिया देताना आकाश महाडीक यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.