इर्ला रस्ता चिखलमय गेल्या २० वर्षांपासून माजलगांव , गेवराईच्या पुढाऱ्यांकडे मागणी करूनही रस्त्यावर साधा मुरुमही पडला नाही
माजलगांव, प्रतिनिधी:- स्वातंत्र्यपूर्व काळात जी रस्त्याची दैयनिय अवस्था होती ती स्वातंत्र्य मिळाल्याच्या सत्तर वर्षानंतरही तालखेड ते इर्ला रस्त्याची असल्याने येथील नागरिकांना या रस्त्यावर गुडघेइतक्या चिखलातून जावे लागते . गरोदर मातेला याच रस्त्याने वाहन जात नसल्याने उचलून नेण्याची वेळ येत आहे . गेल्या २० वर्षांपासून माजलगांव व गेवराई या दोन्ही तालुक्याच्या पुढाऱ्यांकडे मागणी , निवेदन वेळोवेळी मोर्चे काढूनही साधा या रस्त्यावर मुरुमही पडला नाही .
तालखेड येथील इर्ला हा तांडा माजलगांव तालुक्यात येतो तर त्याला मतदारसंघ गेवराई आहे . निवडणुकीच्या काळात गेवराईचे पुढारी येथे येऊन आश्वासने देतात . तर पंचायत समिती , जिल्हा परिषद निवडणुकीत माजलगावचे पुढारी केवळ या रस्त्याचे आश्वासन देतात . मात्र प्रत्यक्षात आजही या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल आहे .गेवराईतून तत्कालीन आमदार बदामराव पंडित , अमरसिंह पंडित यांनी तालखेड ते इर्ला हा रस्ता करण्याचे येथील नागरिकांना आश्वासन दिले होते मात्र अद्यापही त्याचा काहीच उपयोग झाला नाही .
माजलगांवचे प्रकाश सोळंके यांनी देखील नागरिकांना आश्वासने देऊन झुलवत ठेवले . गेल्या पंचवार्षिकला आ . लक्ष्मण पवार यांनी देखील तालखेड येळा – जामगा ते इर्ला तांडा हा रस्ता मी निवडून आल्यावर करतो , असे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते . त्यानंतर ते दुसऱ्यांदा आमदार झाले तरीही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही . येळा – जामगाव व इर्ला या तीन तांड्यांसाठी दळणवळणाचा हा मुख्य रस्ता आहे . येथील नागरिकांना आरोग्यासह इतर सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक वेळा नागरिकांनी आंदोलने केली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही .
झरी येथील 3 रुग्ण बाधीत ; संपर्कातील अकरा जण रुग्णालयात
‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});