एचएसएनसी समुह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

0 136

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतीकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्य आधारीत शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समुह विद्यापीठ स्थापन करावेत.

त्यामुळे नव नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समुह विद्यापीठांच्या उद्‌घाटन प्रसंगी केले.

हिंजवडी येथील कोविड आरोग्य केंद्राचा ऑनलाईन शुभारंभ

 

error: Content is protected !!