कोरोनो रुग्ण वाढीसाठी जबाबदार बेजबाबदार नागरिक व पोलीस प्रशासन?
जळगाव – दिवसेंदिवस जळगाव जिल्हात कोरोनो रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याला जबाबदार बेजबाबदार नागरिक व पोलीस प्रशासन आहे.
प्रवाशी रिक्षा, अँपेरिक्षा व व्हॅन या सारख्या वाहनात कुठलाही सोशल डिस्टंसीनचे नियम न पाळता ,रिक्षा मध्ये 5-6 ,अँपेरिक्षा मध्ये 8-10 तर व्हॅन मध्ये 10-12 असे प्रवाशी बसवून त्यांची वाहतूक केली जाते.या कडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करतांना दिसतात. त्यांच्या या दुर्लक्षाचा फायदा वाहकचालक घेतो व बेजबाबदार नागरिक सोशल डिस्टंसीनचा कुठलाही नियम न पाळता जीव धोक्यात टाकून वाहनामध्ये जवळजवळ बसतात. त्या मध्ये काहींच्या तोंडाला मास्क असतो तर काहींच्या तोंडाला मास्क नसतो काही गुटखा ,तंबाखू खाऊन वारंवार थुकत असतात. तर काहींना ताप,सर्दी सारखे विकार असतात तर काही खोकलत असतात. अशा मुळे कोरोनो संसर्गाचा प्रसार वाढण्यास कारणीबुत ठरू शकतो.जळगाव जिल्हा हा रेड झोन मध्ये असून पूर्ण पणे शिथिल नसतांना रस्त्यावरील वाहतूक ७५ टक्के वाढली आहे. कारण नसतांना फिरणाऱ्या मध्ये टारगट तरुण मुलांचा समावेश जास्त आहे. त्यांना पोलीस प्रशासनाचा धाक संपलेला आहे. तेव्हा या सर्व प्रकाराला बेजबाबदार नागरिक व पोलीस प्रशासन जबाबदार आहे.
राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; राज्यातील ‘या’ शहरांत कडक निर्बंध
प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?