काय आहे ’मिशन बिगीन अगेन’चा दुसरा टप्पा?
मुंबई – अनलॉक 1.0 दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आला असून ज्या ठिकाणी रूग्ण अधिक आहेत तिथे कडक निर्बंध लावले जाणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे अधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे,जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.
राज्यात एक जुलैपासून मिशन बिगीन अगेनच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. यानुसार मागच्याच आठवड्यात राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत ज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. त्यात कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नाही. एकप्रकारे राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवले असे म्हणायला हरकत नाही.
काय आहे ’मिशन बिगीन अगेन’चा दुसरा टप्पा?
– 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन 6.0
– मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या आहेत.
– त्यानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 जुलै रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन कायम असेल.
– अत्यावश्यक दुकानं आणि ऑन-इव्हन नियमानुसारची नियमावली कायम
– सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम
– राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद
– बिगीन अगेननुसार दिलेल्याच सवलतींना मुदतवाढ
देशातील स्थिती चिंताजनक
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत 16 हजार 475 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 3 लाख 21 हजार 722 रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे.
तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पून्हा सुरू केले शुटिंग
तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पून्हा सुरू केले शुटिंग
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});