खळवट लिंबगावच्या आंबुरे कुटुंबीयांनी गावभर जेलीबी वाटुन केल लेकीच्या जन्माच स्वागत..!
वडवणी ,प्रतिनिधी:- ‘मुलगी म्हणजे खर्चाला भार’ या विचाराने तिचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी आहे.तर काही ठिकाणी “मुलगी म्हणजे परक्याचे धन” अशी व्याख्या करून ‘मुलगी नको’ असे म्हणणाऱ्याची संख्या आहे. व काही ठिकाणी मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत केले जाते.
तसेच खळवट लिंबगावच्या भास्कर किसनराव आंबुरे यांच्या कुटुंबीतील जेष्ठ चिरंजीव योगेश आंबुरे, व त्यांच्या पत्नी सुनीता योगेश अंभुरे यांच्या पोटी वार बुधवार दिनांक ८/जुलै/२०२० रोजी पहिले अपत्य म्हणून मुलीचा जन्म झाला.
मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी जन्माला आली अस म्हणत सर्व आंबुरे कुटुंबायांनी अंनदत्सोह साजरा केला. योगेश यांचे लहान बंधु ,महेश आंबुरे ,त्यांचे मित्र गोकुळ माने, यांनी “मुलगा मुलगी एकसमान ” असा संदेश देत गावभर गोड जिलेबीच वाटप केल.आपल्या गावात मुलीच्या जन्माचे असच आपण सर्वांनी स्वागत कराव असा संदेश आंबुरेयांनी दिला.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});